Dev Devharyat Nahi Song Lyrics in Marathi

देव देव्हार्‍यात नाही
देव नाही देवालयी
देव चोरून नेईल
अशी कोणाची पुण्याई

देव अंतरात नांदे
देव दाही दिशी कोंदे
देव आभाळी सागरी
देव आहे चराचरी
देव शोधूनिया पाही
देव सर्वाभूताठायी

देव मूर्तीत ना मावे
तीर्थक्षेत्रात ना दावे
देव आपणांत आहे
शिर झुकवोनिया पाहे
तुझ्यामाझ्या जड देही
देव भरूनिया राही

देव स्वये जगन्‍नाथ
देव अगाध अनंत
देव सगुण निर्गूण
देव विश्वाचे कारण
काळ येई काळ जाई
देव आहे तैसा राही

गीत – ग. दि. माडगूळकर
संगीत – सुधीर फडके
स्वर – सुधीर फडके
चित्रपट – झाला महार पंढरीनाथ