Deh Shuddha Karuni Abhang Lyrics in Marathi

देह शुद्ध करुनी भजनीं भजावे ।
आणिकाचें नाठवावें दोषगुण ॥१॥

साधनें समाधी नको पां उपाधि ।
सर्व समबुद्धी करी मन ॥२॥

ह्मणे जनार्दन घेई अनुताप ।
सांडी पां संकल्प एकनाथा ॥३॥

– संत जनार्दन महाराज