Deh Javo Athava Raho Abhang Lyrics in Marathi

देह जावो अथवा राहो । पांडुरंगीं दृढ भावो ॥१॥

चरण न सोडीं सर्वथा । आण तुझी पंढरिनाथा ॥२॥

वदनीं तुझें मंगलनाम । हृदयीं अखंडित प्रेम ॥३॥

नामा ह्मणे केशवराजा । केला पण हा चालवीं माझा ॥४॥

– संत नामदेव