मी मनसोक्त रडून घेतो घरात कुणी नसल्यावर
मग सहज हसायला जमतं चारचौघात बसल्यावर
मला माहित होतं तू मागे वळून पाहशील
मागे वळून पाहण्याइतपत तू नक्कीच माझी राहशील
लोक मंदिरात गेल्यावर कसे बाजारात गेल्यासारखे वागतात
चार आठाणे टाकून काही ना काही मागतात
हल्ली मी आरश्यात पहायचं टाळतो कारण नसते प्रश्न उभे राहतात
हल्ली माझेच डोळे माझ्याकडे अगदी अनोळख्या नजरेने पाहतात
तुझ्यासाठी श्वास घेऊ शकत नाही हि सुद्धा माझ्या दृष्टीने उणीव आहे
खरं सांगू … निव्वळ तुझं प्रेम हीच मी जिवंत असल्याची जाणीव आहे
Marathi Charolya by Chandrashekhar Gokhale
2 thoughts on “Chandrashekhar Gokhale Marathi Charolya”
pratek charoli manala bhavnari ahe
Really nice…