Chaitra Nesto Satra Sadya Marathi Balgeet Lyrics

चैत्र नसतो सतरा साड्या
वैशाख ओढतो वऱ्हाडाच्या गाड्या

जेष्ठ बसतो पेरीत शेती
आषाढ धरतो छत्री वरती

श्रावण लोळे गवंतावरती
भाद्रपद गातो गणेश महती

अश्विन कापतो आडवे भात
कार्तिक बसतो दिवाळी खात

मार्गशीर्ष घालतो शेकोटीत लाकडे
पौषाच्या अंगात उबदार कपडे

माघ करतो झाडी गोळा
फाल्गुन फिरतो जत्रा सोळा

वर्षाचे महिने असतात बारा
प्रत्येकाची न्यारीच तऱ्हा