चाफा बोलेना चाफा चालेना
चाफा खंत करी, काही केल्या फुलेना
गेले ‘आंब्याच्या’ बनी म्हंटली मैनांसवें गाणी
आम्ही गळ्यांत गळे मिळवून रे
गेले केतकिच्या बनी गंध दरवळला वनी
नागासवें गळाले देहभान रे
चल ये रे, ये रे गड्या नाचु, उडू घालु फुगड्या
खेळु झिम्मा झिम् पोरी झिम् पोरी झिम्
हे विश्वाचे अंगण अम्हां दिले आहे आंदण
उणे करू आपण दोघेजण रे
जन विषयाचे किडे यांची धाव बाह्याकडे
आपण करू शुद्ध रसपान रे
चाफा फुली आला फुलून तेजी दिशा गेल्या आटुन
कोण मी – चाफा ? कोठे दोघे जण रे ?
