Bolu Aise Bole Abhang Lyrics in Marathi बोलूं ऐसे बोले । जेणें बोलें विठ्ठल डोले ॥१॥ प्रेम सर्वांगाचे ठायीं । वाचें विठ्ठल रखुमाई ॥२॥ नाचूं कीर्तनाचे रंगीं । ज्ञानदीप लावूं जगीं ॥३॥ परेहुनि परतें घर । तेथें राहूं निरंतर ॥४॥ सर्वसत्ता आली हातां । नामयाचा खेचर दाता ॥५॥ – संत नामदेव