Bhav Tochi Dev Abhang Lyrics in Marathi भाव तोंचि देव भाव तोंचि देव । ये अर्थी संदेह धरूं नका ॥१॥ भावें भक्ति फळे भावें देव मिळे । निज भावें सोहाळे स्वानंदाचे ॥२॥ भावचि कारण भावचि कारण । या परतें साधन नाहीं नाहीं ॥३॥ एकाजनार्दनीं भावचि कारण । सच्चिदानंदावरील दावी खूण ॥४॥ – संत एकनाथ