एकदा एका मुलीनं तक्रार केली बापाकडे
मलाच का बंधने? जाऊ नको कुणीकडे
का सारखे कपड्यांवरून बोलणे आणि माझ्या मित्रांबाबत चौकशी करणे
का मीच उंबऱ्याच्या आत रहायचं आणि उठता बसता स्वत:ला सावरायचं
बाप बोलला बेटी म्हणणे तुझं पटतंय
चल जरा बाहेर, आत खूप उकडतंय
पेठेतून जाताना दिसलं दुकान लोखंडाच
बाहेरच पडलं होतं अवजड समान लोहाचं
बाप बोलला, बेटी हे उन पावसात इथच असतं
तरी पण याला काही होत नसतं, कोणी नेत नसतं
किमतीत पण याच्या अधिक उणं होत नसतं
जरा पुढे जाताच सोनाराच दुकान दिसलं
आत जाऊन मग बापानं हिऱ्याच मोल पुसलं
तिजोरीतून बंद पेटी हळुवारपणे पुढे मांडली
त्याच्या झगमगाटात नजरच दिपली
सराफ बोलला किमती आहे, फार जपावं लागतं
जरा सुद्धा चरा पडता मोल याचं कचऱ्याच होत
काळजी घेऊन मलमली कपड्यात जपून ठेवावं लागतं
तिजोरीच्या आत लपवावं लागतं
फिरून घरी येताच बाप बोलला, बेटी तुच तर माझी हिऱ्याची पेटी
संग तुला जपण्यात काय माझं चुकतं, तुझ्यामुळेच माझं घर सारं झगमगत
तुझा दादा म्हणजे लोखंड, जपावं लागत नाही
तू म्हणजे अनमोल हिरा, सांग चुकतं का काही
तुझ्यामुळे घर प्रकाशित आमचा तू अभिमान
तुझ्यासाठी काळीज तुटतं तू जीवन की प्राण
सर्व बघून मुलीचे डोळे पाणवले, बापापुढे झुकली मन शरमेने
कळलं तिला सगळं मन तिचं हेलावलं
बस्स करा बाबा ऐकवत आता नाही, तुमच्याकडे माझी तक्रार मुळीच नाही
मीच मला आता जीवापाड जपेन, हिऱ्याच्या तेजानं चौफेर चामकेन
मुलगा मुलगी सम समान हे जरी असलं खरं
पण आपल्या बहिण लेकीला अधिक जपलेलंच बरं
पटवून द्या तिला, बेटी तू हिरा आहेस
आमच्या आनंदाचा तू झरा आहेस
Kavi – Unknown
