Bayko Zali Hi Fi

घरी आले Wi-Fi अन बायको झाली हाय फाय
कितीही जोरात आवाज द्या कानावर काही पडतच नाय

नवरा : अगं जरा ऐकतेस काय?
बायको : थांबा मला वेळ नाय

नवरा : एवढी कशात बिझी हाय?
बायको : हे मेले WhatsApp चालतच नाय

नवरा : मी काय म्हणत होतो
बायको : बोला मी ऐकते हाय

नवरा : मी बाहेर चाललो होतो. काही सामान आणायचे काय?
बायको : किती वेळा सांगू तुम्हाला WhatsApp वर लिस्ट पाठवली हाय

नवरा : पिंट्या आजून आला नाही, क्लास कधी सुटणार हाय?
बायको : तुम्ही काळजी करू नका मी स्टेटस पाहिलं हाय

नवरा : एवढं कसलं टेन्शन आलंय, कोणती वस्तू सापडत नाय?
बायको : वस्तू बिस्तू खड्यात गेली, कालचा मेसेज सापडत नाय

नवरा : आज मला सुट्टी हाय नास्ता पाण्याचा बेत काय?
बायको : ग्रुप मध्ये व्हिडिओ आलाय तीच डिश करणार हाय

नवरा : अगं तुझी ती मैत्रीण बऱ्याच दिवसात दिसली नाय
बायको : तुम्हाला तिच्याशी काय  काम? WhatsApp वर मी तिच्या टच मध्ये हाय

नवरा : काय ग, आज काल माझ्याशी तू हसून खेळून बोलतच नाय
बायको : प्रॉब्लेम तर तुमचाच हाय माझा स्माईली तुम्ही बघतच नाय

कवी : UNKNOWN