Bayko Sarkhi Preysi Nahi

व्हॅट्सऍप वर चाट करणारी प्रेमिका भेटेल पण
प्रत्येक मिनीटाला तुमची काळजी करणारी बायको सारखी प्रेयसी नाही

हॉटेलात तुमच्या बरोबर जेवण करणारी प्रेमिका तुम्हाला भेटेल पण
तुम्ही घरी येईपर्यंत जेवणासाठी वाट बघणारी बायको सारखी प्रेयसी नाही

तुमच्याकडून गिफ्ट स्वीकारणारी प्रेमिका तुम्हाला भेटेल पण
तुमच्या वाढदिवसाला गुलाबाचे फुल देणारी बायको सारखी प्रेयसी नाही

तुमच्या बाईक वर मागे बसून फिरणारी प्रेमिका तुम्हाला भेटेल पण
तुम्ही प्रवासात असताना जेवले का म्हणून विचारणारी बायको सारखी प्रेयसी नाही

तुमचे हातपाय दुखेल एवढी बेधुंद होऊन तुमच्या सोबत नाचणारी प्रेमिका तुम्हाला भेटेल पण
कामावरून थकून आल्यावर तुमचे हातपाय दाबून देणारी बायको सारखी प्रेयसी नाही

तुमच्याबरोबर ज्युस पिणारी प्रेमिका तुम्हाला भेटेल पण
तुम्ही उन्हातून आल्यावर माठातील थंड ग्लासभर पाणी देणारी बायको सारखी प्रेयसी नाही

तुमच्या पैशाने खरेदी करणारी प्रेमिका तुम्हाला भेटेल  पण
पैशाला पैसा जोडून काटकसरीचा संसार करणारी बायको सारखी प्रेयसी नाही

बारा होशील ना लवकर असे म्हणणारी प्रेमिका तुम्हाला भेटेल पण
तुम्हाला ठेच लागली म्हणून डोळे भरून येणारी बायको सारखी प्रेयसी नाही

भेटायला यायला तुला किती वेळ लागेल असं विचारणारी प्रेमिका तुम्हाला भेटेल पण
तुम्हाला घरी यायला उशीर झाला म्हणून उंबऱ्यात उभी राहून वाट पाहणारी बायको सारखी प्रेयसी नाही

कवी : UNKNOWN