Ashi Dhara Ase Gagan Song Lyrics in Marathi

अशी निशा पुन्हा कधी दिसेल का?
अशी धरा असे गगन सजेल का?

सुरम्य चंद्रबिंब तारकावली
निशा चढे निशेस चोरपाउली
ढगांत चंद्र मग जरा लपेल का?

सुगंध रातराणीचा तरंगतो
प्रशांत धुंद आसमंत पेंगतो
दंवात मग धरा जरा भिजेल का?

विशाल तो कदंब झेली चांदणे
मिठीत भान हरपुनी सुखावणे
अशीच ऊर्मी अंतरी निवेल का?

गीत – यशवंत देव
संगीत – यशवंत देव
स्वर – पं. हृदयनाथ मंगेशकर, लता मंगेशकर
चित्रपट – कामापुरता मामा