Ashakya To Tumha Nahi Abhang Lyrics in Marathi

अशक्य तों तुम्हा नाही नारायणा
निर्जिवा चेतना आणावया ॥१॥

मागें काय जाणों स्वामीचे पवाडे
आतां कां रोकडे दावूं नये ॥२॥

थोर भाग्य आम्ही समर्थाचे कांसे
म्हणवितो दास काय थोडें ॥३॥

तुका म्हणे माझे निववावे डोळे
दावूनि सोहळे सामर्थ्याचे ॥४॥

शंखचक्रगदापद्म
पैल आला पुरुषोत्तम ॥५॥

ना भी ना भी भक्तराया
वेगीं पावालों सखया ॥६॥

दुरूनि येतां दिसे दृष्टी
धाकें दोष पळती सृष्टी ॥७॥

तुका देखोनि एकला
वैकुंठीहूनि हिर आला ॥८॥

– संत तुकाराम महाराज