वरती खाली मोद भरे , वायूसंगे मोद फिरे
नभांत भरला, दिशांत फिरला, जगांत उरला
मोद विहरतो चोहिकडे
सूर्यकिरण सोनेरी हे , कौमुदि ही हसते आहे
खुलली संधया प्रेमाने , आनंदे गाते गाणे
मेघ रंगले, चित्त दंगले, गान सफुरले
इकडे, तिकडे, चोहिकडे
नीलनभी नक्षत्र कसे , डोकावुिन हे पाहतसे
कुणास बघते ? मोदाला; मोद भेटला का त्याला ?
तयामधे तो, सदैव वसतो, सुखे विहरतो
इकडे, तिकडे, चोहिकडे
वाहति निर्झर मंदगती , डोलित लतिका वृक्षतती
पकी मनोहर कूजित रे , कोणाला गातात बरे ?
कमल विकसले, भ्रमर गुंगले, डोलत वदले
इकडे, तिकडे, चोहिकडे
स्वार्थाच्या बाजारात, किती पामरे रडतात
त्यांना मोद कसा मिळतो , सोडुिन स्वार्था तो जातो
द्वेष संपला, मत्सर गेला, आता उरला
इकडे, तिकडे, चोहिकडे
