Amrutachi Phale Abhang Lyrics in Marathi

अमृताचीं फळें अमृताची वेली
तेचि पुढें चाली बीजाची ही ॥१॥

ऐसियांचा संग देइ नारायणा
बोलावा वचना जयांचिया ॥२॥

उत्तम सेवन सितळ कंठासी
पुष्टी कांती तैसी दिसे वरी ॥३॥

तुका ह्मणे तैसें होइजेत संगें
वास लागे अंगें चंदनाच्या ॥४॥

– संत तुकाराम महाराज