Aho Sajana Dur Vha Song Lyrics in Marathi

असेल कोठे रुतला काटा माझ्या तळपायात
लाडीगोडीनं तुम्ही फिरवता पाठीवरती हात

याचा बोभाट होईल उद्या
मला लौकर घराकडे जाऊ द्या
अहो सजना, दूर व्हा, दूर व्हा ना
जाऊ द्या, सोडा, जाऊ द्या

अर्ध्या वाटेत काटा मला लागला
कसे कोठुन तुम्ही इथं धावला
आहे तस्साच काटा तिथं राहू द्या
मला लंगडत घराकडं जाऊ द्या

तिन्हीसांजची वेळ अशी वाकडी
इथं शेजारी नणंदेची झोपडी
आहे तस्संच येणंजाणं राहू द्या
आता अब्रूनं घराकडे जाऊ द्या

गीत – ग. दि. माडगूळकर
संगीत – सुधीर फडके
स्वर – आशा भोसले
चित्रपट – आराम हराम आहे