Aga Naach Naach Naach Radhe Song Lyrics in Marathi

यमुनेच्या काठावर किसन मुरलीधर
कुणी म्हणे गिरिधर नरवर नटवर
कुंजवनी खेळतो रासरंग
एक नटरंगी नार करी सोळा शिणगार
आली छन्‌न्‌न्‌ नाचत उडवी बहार
किती आल्या गोपगोपिका
कन्हैया सखा छेडतो राधा सखीला
कसा कसा कसा? असा

अगं नाच नाच नाच राधे उडवूया रंग
रंगामध्ये भिजंल तुझं गोरंगोरं अंग

घडा घेऊन शिरी घाट चढलीस कशी
आडवाटेवरी आज अडलीस कशी
मदनाचं रूप घेई राजा श्रीरंग

ढंग न्यारा तुझा, असा तरूणपणा
तुझा शिणगार करतोया खाणाखुणा
दंडामध्ये कसली ग काचोळी ही तंग

गीत – जगदीश खेबूडकर
संगीत – विश्वनाथ मोरे
स्वर – उत्तरा केळकर, सुरेश वाडकर
चित्रपट – गोंधळात गोंधळ