Aathvan Yete Kadhi Mala

आठवण येते कधी मला अन गालावर खुदकन खळी पडते
तर कधी हसता हसता डोळी माझ्या पाणी आणते

गर्दीत राहून सुद्धा ती एकांताचा आभास देते
अन एकांतात गेलो तरी मला नाही कधी एकटे सोडते

डोळे बंद केल्यावरचे नवे विश्व दाखवून देते
अन उघड्या डोळ्यांनाही ती कधी धुंद करून टाकते

दूर लोटायचा प्रयत्न केला तर अधिकच जवळ येउन बसते
जवळ तिला बोलावले तर मात्र कोपऱ्यात कुठे दडून बसते

हीच आहे माझी खरी मैत्रीण नेहमी साथ देणारी
आगंतुक असली तरी हवी हवीशी वाटणारी

कवी : सागर