Aata Samplay Te Sara

आता संपलंय ते सारं
आता संपलय ते भास होणे

तू नसलेल्या ठिकाणी तुला पहाणे
आता संपलंय ते सारं …
आता संपलंय

ते तुझे शब्द आठवणे
तू बोलत असताना माझे गप्प होणे
आणि तुला एकटक बघत राहणे
आता संपलंय ते सारं

आता संपलंय ती भांडणे
शुल्लक गोष्टीवरून रुसणे
थोडा वेळ अबोला धरणे
आणि नंतर मीच स्वॉरी स्वॉरी म्हणणे
आता संपलंय

एकटे असताना तुला आठवणे
तुला आठवून माझे हळवे होणे
हळूच अलगद, डोळ्यांतून पाणी ओघळणे
आता संपलंय ते सारं

कवी – अज्ञात