Aamuchi Maliyachi Jaat Abhang Lyrics in Marathi

आमुची माळियाची जात ।
शेत लावूं बागाईत ॥१॥

आम्हां हातीं मोट नाडा ।
पाणी जातें फुलझाडां ॥२॥

शांति शेवंतीं फुलली ।
प्रेम जाई-जुई व्याली ॥३॥

सांवत्याने केला मळा ।
विठ्ठल देखियेला डोळां ॥४॥

– संत सावता माळी