Aamhi Thakar Thakar Song Lyrics in Marathi

आम्ही ठाकर ठाकर ह्या रानाची पाखरं
या झांबर्‍या गर्दीत मांडुन इवले घर

या पिकल्या शेतांवर तुझ्या आभाळाचा जर
या डोंगरवस्तीवर भोळ्या संभूची पाखर
त्याच्या पंखात पंखात नांदतोया संसार

आल्या बरसाती घेऊन मेघमल्हाराची धून
त्या झिंगल्या झाडांना बांधले पैंजण
चांदण्या गोंदून धरलीया झालर

गीत – ना. धों. महानोर
संगीत – पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर – चंद्रकांत काळे, रवींद्र साठे
चित्रपट – जैत रे जैत