Aamhi Jato Aapulya Gava Bhajan Lyrics in Marathi

आम्ही जातो आपुल्या गावा
आमचा राम राम घ्यावा ॥१॥

तुमची आमची हेचि भेटी
येथुनियां जन्मतुटी ॥२॥

आतां असों द्यावी दया
तुमच्या लागतसें पायां ॥३॥

येतां निजधामीं कोणी
विठ्ठल विठ्ठल बोला वाणी ॥४॥

रामकृष्ण मुखी बोला
तुका जातो वैकुंठाला ॥५॥

– संत तुकाराम महाराज