Aamha Ghari Dhan Abhang Lyrics in Marathi आह्मां घरीं धन शब्दाचींच रत्नें । शब्दाचींच शस्त्रें यत्ने करूं ॥१॥ शब्दचि आमुच्या जिवाचें जीवन । शब्दें वांटूं धन जनलोकां ॥२॥ तुका ह्मणे पहा शब्दचि हा देव । शब्देंचि गौरव पूजा करूं ॥३॥ – संत तुकाराम महाराज