Aalavita Dhav Ghali Abhang Lyrics in Marathi आळवितां धांव घाली । ऐसी प्रेमाची भुकेली ॥१॥ ते हे यशोदेच्या बाळा । बरवी पाहतसें डोळां ॥२॥ विटेवरी उभी नीट । केली पुंडलिकें धीट ॥३॥ स्वानंदाचें लेणें ल्याली । पाहून दासी जनी धाली ॥४॥ – संत जनाबाई