Aaji Soniyacha Dinu Abhang Lyrics in Marathi

आजि सोनियाचा दिनु
वर्षे अमृताचा घनु ॥१॥

हरि पाहिला रे हरि पाहिला रे
सबाह्याभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी ॥२॥

दृढ विटे मन मुळी
विराजित वनमाळी ॥३॥

बरवा संतसमागमु
प्रगटला आत्मारामु ॥४॥

कृपासिंधु करुणाकरु
बाप रखमादेविवरू ॥५॥

– संत ज्ञानेश्वर