Aai Marathi Charolya

Aai Marathi Charolya

एकदा जरासं कुठे खरचटलो
आई, किती तू कळवळली होतीस
एक धपाटा घालून पाठीत
जख्मेवर फुंकर घातली होतीस


Aai Marathi Charolya

प्रेम वात्सल्य माया
अशीच तिची मूर्ती
म्हणून तर जगात
सर्वदूर आईची किर्ती


Aai Marathi Charolya

आई म्हणजे मंदिराचा उंच कळस
आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस
आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी
आई म्हणजे वाळवंटात प्यावे असे थंड पाणी


Aai Marathi Charolya

आई जीवनाची ज्योत आहे
आई जीवनाचा पोत आहे
आईच आहे जिच्या मनी
ममतेची प्रकाशझोत आहे


Aai Marathi Charolya

आई तुझ्या कुशीत,
पुन्हा यावेसे वाटते
निर्दयी या जगापासुन,
दुर जावेसे वाटते


आई सगळ्यांपेक्षा वेगळी का असते?
कारण,पावसात भिजून आल्यावर…
ताई म्हणते, “थोडा वेळ थांबता आलं नाही का?”
दादा म्हणतो,”थोडं लवकर निघता आलं नाही का?”
बाबा म्हणतात, “छत्री घेऊन जाता येत नाही का?”
पण आईच जवळ घेऊन डोकं पुसत म्हणते, “मेलं ह्या पावसाला पण कधी यावं काय कळतंच नाही


Aai Marathi Charolya

आई, तुझ्या रागवण्यातही
अनूभवलाय वेगळाच गोडवा
तुझ्या मायेच्या नित्य नव्या सणात
फिका पडतो दसरा नि पाडवा


Aai Marathi Charolya

मायेन भरलेला
कळस म्हणजे आई,
मायेन विसावा देणारी
सावळी म्हणजे आई


शोधून मिळत नाही पुण्य
सेवार्थाने व्हावे धन्य
कोण आहे तुजविण
‘आई’ तुजविण जग हे शून्य


पूर्वजन्माची पुण्याई असावी
जन्म जो तुझ्या गर्भात घेतला,
जग पाहिलं नव्हतं तरी
नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला


आई मराठी चारोळ्या

आई… हा शब्दच इतका गोड आणि जिव्हाळ्याचा आहे की त्यात संपूर्ण आयुष्य सामावलेलं असतं. आई म्हणजे प्रेम, त्याग, आधार आणि निरपेक्ष माया यांचं मूर्त रूप. या सगळ्या भावनांना शब्दांत व्यक्त करायचं झालं, तर “aai marathi charolya” हा एक अत्यंत सुंदर आणि प्रभावी मार्ग ठरतो. चार ओळींमध्ये आईबद्दलच्या भावना मांडण्याची कला म्हणजेच आई साठी लिहिलेल्या मराठी चारोळ्या.

आईवरील चारोळ्यांचे महत्त्व

आईवर लिहिलेल्या चारोळ्या या प्रत्येकासाठी खास असतात. कारण आई हे नातं प्रत्येकाच्या आयुष्यात अनमोल असतं. चारोळ्यांच्या माध्यमातून आपण आईच्या प्रेमाची, त्यागाची आणि कष्टांची कदर व्यक्त करू शकतो.

या चारोळ्यांचा वापर विविध ठिकाणी केला जातो:

  • Mothers Day किंवा वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी
  • WhatsApp स्टेटस किंवा सोशल मीडिया पोस्टसाठी
  • आईसाठी खास संदेश पाठवण्यासाठी
  • लेखन, कविता किंवा भाषणांमध्ये आईबद्दल भावना व्यक्त करण्यासाठी

Aai Marathi Charolya का लोकप्रिय आहेत?

लोकांना त्यांच्या भावना साध्या आणि प्रभावी पद्धतीने व्यक्त करायच्या असतात. चारोळ्या या त्यासाठी उत्तम पर्याय ठरतात. विशेषतः आईवर आधारित चारोळ्या वाचकांच्या मनाला लगेच भिडतात म्हणून या चारोळ्या खूपच लोकप्रिय आहेत.

आजच्या काळात सोशल मीडिया हा भावना व्यक्त करण्याचा एक मोठा प्लॅटफॉर्म बनला आहे. “आई मराठी चारोळ्या” मोठ्या प्रमाणात Instagram captions, Facebook पोस्ट आणि WhatsApp स्टेटस म्हणून वापरल्या जातात. त्यामुळे त्यांची पॉप्युलॅरीटी खूपच वाढली आहे. चार ओळींमध्ये व्यक्त होणाऱ्या या भावना प्रत्येकाच्या मनाला खोलवर स्पर्श करतात.