Aai Marathi Charolya

आई म्हणजे मंदिराचा उंच कळस
आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस
आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी
आई म्हणजे वाळवंटात प्यावे असे थंड पाणी


आई सगळ्यांपेक्षा वेगळी का असते?
कारण,पावसात भिजून आल्यावर…
ताई म्हणते, “थोडा वेळ थांबता आलं नाही का?”
दादा म्हणतो,”थोडं लवकर निघता आलं नाही का?”
बाबा म्हणतात, “छत्री घेऊन जाता येत नाही का?”
पण आईच जवळ घेऊन डोकं पुसत म्हणते, “मेलं ह्या पावसाला पण कधी यावं काय कळतंच नाही