Aai Baba Mala Jagu Dya

नाही करणार मी कोणताच हट्ट
मी स्वतः करीन कष्ट, खाईन माझ्या भावाचे उष्ट
पण आई बाबा मला जगू द्या

तुमच्या शेतात राबेन, उत्तम शिक्षण घेईन
तुमच्या भावना मनापासून जपेन
पण आई बाबा मला जगू द्या

चांगल्या शाळेत टाका हा हट्ट धरणार नाही
चांगल्या कपड्याची मागणी करणार नाही
चांगल्या घरी मला द्या हे पण मी बोलणार नाही
पण आई बाबा मला जगू द्या

मला वाटतंय चेहरा पाहीन
तुमच्या अंगा खांद्यावर मी खेळेन
तुमच्या गळ्याला लाडाने मी मिठी मरेन
पण आई बाबा मला जगू द्या

माझे हि काही स्वप्न आहेत ते मला पाहू द्या
माझ्या दादाला राखी मला बंधू द्या
त्याच्याकडून छोटीशी खेळणी मला घेऊ द्या
पण आई बाबा मला जगू द्या

तुमची मान खाली होईल असे वागणार नाही
तुमच्या अपेक्षा भंग करणार नाही
तुमच्या नावाची कीर्ती वाढविल्याशिवाय राहणार नाही
पण आई बाबा मला जगू द्या

आई तू पण कोणाची तरी मुलगीच आहेस ना ग
त्यांनी तुला कसं वाढवलं ग
आताच का तू एवढी कठोर झालीस ग
पण आई बाबा मला जगू द्या

कवी : UNKNOWN