Gulabi Sadi Song Lyrics in Marathi

काजळ लावुनी आले मी आज
असं नका बघू, अहो, येते मला लाज
केला श्रृंगार आज घातलाया साज
दिसते मी भारी, जणू अप्सरा मी खास

ए नखरेवाली, कुठे निघाली?
घालुनी साडी लाल-गुलाबी
पागल करते तुझी मोरनीशी चाल

गुलाबी साडी आणि लाली लाल-लाल
दिसते मी भारी, राजा, फोटो माझा काढ
गुलाबी साडी आणि लाली लाल-लाल
दिसते मी भारी, राजा, फोटो माझा काढ

झाला क्लोज आता वाईड, मान वरती ओके राईट!
फोटो काढतो असा होणार ज्याने वातावरण टाईट
मस्त खुशीमध्ये बायको माझी करीन पिलो फाईट
माझा होऊ दे पगार, गिफ्ट करतो रिंग लाईट

नको मला चहा-खारी, आता जेवण करून जाईन
सेलेब्रेटी तू, मी तुझा पीए बनून राहिन
येणार सेल्फी साठी क्राऊड मला फील होणार प्राऊड
जाशीन इन्स्टा वरलाईव्ह अन मी कमेंट करत पाहीन

करीन कष्ट, माझ्या पैशाने घेणार मेक-अप कीट
राजा, होणार मी इन्स्टाची स्टार हाये
गुलाबी साडी आणि लाली लाल-लाल
दिसते मी भारी, राजा, फोटो माझा काढ
गुलाबी साडी आणि लाली लाल-लाल
दिसते मी भारी, राजा, फोटो माझा काढ
किती मीक्युट, किती गोड, किती छान
दिसते मी भारी, राजा, फोटो माझा काढ

अदा माझी सिंपल, नसले जरी डिम्पल
हेरॉईन दिसते, मी हेरॉईन
थोडे दिवस थांब अशी लाईन लागीन लांब
मी पण बनूनच दाखवीन हेरॉईन

ए, माझी जस्मिन, तू माझी खास
मी तुझा समर्थक उद्या पण आज भी
बोल्लेलो, “किस मी,” ती बोल्ली, “आज नाही”
“बनू नको म्हणे इमरान हाश्मी”
माथ्याची टिकली, पैंजण, बांगडी
हिऱ्याची अंगठी मारुती कार विथ
चांदीच कंगण, सोन्याचा कंठण
करीन गिफ्ट, नाय करत मजाक मी

पुरी करीन तुझी हर एक विश
नको करु शंका, ना सवाल

हाय, गुलाबी साडी आणि लाली लाल-लाल
दिसते ती भारी म्हणे, “फोटो माझा काढ”
गुलाबी साडी आणि लाली लाल-लाल
दिसते ती भारी म्हणे, “फोटो माझा काढ”


“गुलाबी साडी” – संजू राठोड : सारांश

Sanju Rathod यांचे “गुलाबी साडी” हे अत्यंत लोकप्रिय मराठी गाणे प्रेम, आकर्षण आणि मराठमोळ्या सौंदर्याचे सुंदर चित्रण करते. या गाण्यात नायक एका तरुणीच्या सौंदर्याचे कौतुक करताना तिच्या गुलाबी साडीतील मोहक रूपाचे वर्णन करतो. तिची निरागसता, आत्मविश्वास, नजरेतील जादू आणि पारंपरिक वेशभूषेतील आकर्षक व्यक्तिमत्त्व यामुळे तो तिच्याकडे अधिकाधिक आकर्षित होत जातो.

गाण्यातील गुलाबी साडी ही केवळ एक मराठमोळी वेशभूषा नसून प्रेम, आनंद, उत्साह आणि मराठी संस्कृतीचे प्रतीक म्हणून दाखवली आहे. आधुनिक संगीत, मराठमोळा ठेका आणि सोप्या शब्दांमुळे हे गाणे तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय झाले. गाण्याच्या माध्यमातून पारंपरिक मराठी पोशाख आणि आधुनिक भावनांचा सुंदर संगम अनुभवायला मिळतो.

या गाण्याचा मुख्य संदेश असा आहे की सौंदर्य हे केवळ बाह्य रूपात नसून व्यक्तिमत्त्व, आत्मविश्वास आणि सांस्कृतिक ओळख यांमध्येही दडलेले असते. प्रेमात पडलेल्या व्यक्तीच्या नजरेतून प्रिय व्यक्तीचे कौतुक आणि तिच्याबद्दलची ओढ या गाण्यात प्रभावीपणे व्यक्त केली आहे.


Gulabi Sadi ( गुलाबी साडी ) | Official Video | Sanju Rathod