Nauvari Sadi Pahije Song Lyrics in Marathi

कुंकू लावणार फक्त तुझ्या नावाचं
हाय तुझ्या हाताने मांग भरून दे
सुखा दु:खाची साथी तुझी होणारी
हाय तुझ्या हाताने घास भरून दे

कुंकू लावणार फक्त तुझ्या नावाचं
हाय तुझ्या हाताने मांग भरून दे
सुखा दु:खाची साथी तुझी होणारी
हाय तुझ्या हाताने घास भरून दे

तु फक्त बोल कुठली गाडी पाहिजे
हिरो होंडा की ऑडी पाहिजे
ओठांची लाली नी कानाची बाली
की हातात सोन्याची घडी पाहिजे

नको मला बंगला नको गाडी पाहिजे
राजा मला नऊवारी साडी पाहिजे
नको मला बंगला नको गाडी पाहिजे
राजा मला नऊवारी साडी पाहिजे

सजून धजून इन्स्टा वर रील करते तुझ्यासाठी
कशी तुला सांगू किती फील करते तुझ्यासाठी
माझ्यामागे लाखो, हजारो लागले
तरी आहे बावरी मी फक्त राजा तुझ्यासाठी
मी कुठे बोलते की मॉल मला घेऊन चल
कुठे पण चालेल, चल टाऊन मला घेऊन चल

लाडान घेऊन दे मस्त तुझ्या हाताने
शोभून दिसली आपली जोडी पाहिजे
एक नाही राजा मला जोडी पाहिजे
राजा मला नऊवारी साडी पाहिजे

नको मला बंगला नको गाडी पाहिजे
राजा मला नऊवारी साडी पाहिजे
नको मला बंगला नको गाडी पाहिजे
राजा मला नऊवारी साडी पाहिजे

डोन्ट वरी, माझी परी
उद्या येतो, तुझ्या घरी
मला जेवण गीवन नको
फक्त चहा आणि खारी… लय भारी
मी तुझ्यासाठी घेतली नऊवारी
नऊवारी मधे राणी तु दिसणार भारी
तु माझी प्राजू पतली मी तुझा दगड
टाइमपास नाही राणी प्रेम आपलं तगडं

एव्हरीबडी नोज
आपण दोघं लय क्लोज
जशी तू आहे बुक
आणि मी तुझा कवर
पूरी करीन तुझी हर एक वीश
डोळ्यामध्ये नको तुझ्या पाणी पाहिजे

नको मला बंगला नको गाडी पाहिजे
राजा मला नऊवारी साडी पाहिजे
नको मला बंगला नको गाडी पाहिजे
राजा मला नऊवारी साडी पाहिजे


“नऊवारी साडी पाहिजे” – संजू राठोड : सारांश

नऊवारी साडी पाहिजे हे संजू राठोड यांचे लोकप्रिय मराठी प्रेमगीत आहे. या गाण्यात एका तरुणीच्या मनातील साध्या आणि निरागस प्रेमभावना व्यक्त केल्या आहेत. ती आपल्या प्रियकराला सांगते की तिला महागडी गाडी, बंगला किंवा सोन्याचे दागिने नकोत; तिची खरी इच्छा म्हणजे प्रेम, जिव्हाळा आणि नात्यातील आपुलकी हवी आहे. त्याचे प्रतीक म्हणून ती नऊवारी साडी मागते.

गाण्यातील नायिका आपल्या प्रियकरासोबत आयुष्यभराची साथ, विश्वास आणि प्रेमाचे नाते जपण्याची इच्छा व्यक्त करते. आधुनिक काळातील सोशल मीडियाचा संदर्भ देतानाच गाणे मराठी संस्कृतीतील नऊवारी साडीचे महत्त्व आणि पारंपरिक मूल्ये अधोरेखित करते. दुसरीकडे, नायक तिच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याचे आश्वासन देतो आणि त्यांच्या प्रेमाची ताकद दाखवतो.

या गाण्याचा मुख्य संदेश असा आहे की खरे प्रेम हे भौतिक सुखांपेक्षा अधिक मौल्यवान असते. प्रेम, विश्वास, जिव्हाळा आणि सांस्कृतिक जडणघडण यांनाच आयुष्यात खरे महत्त्व आहे. आकर्षक संगीत, सोपे शब्द आणि मराठमोळा साज यामुळे हे गाणे तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय झाले.

संक्षिप्त सारांश:

“नऊवारी साडी पाहिजे” हे गाणे एका प्रेमळ नात्यातील साधेपणा, मराठी संस्कृतीवरील प्रेम आणि भौतिक गोष्टींपेक्षा भावनिक नात्यांचे महत्त्व यांचे सुंदर चित्रण करते.


Nauvari (नऊवारी पाहिजे) | Official Video | Sanju Rathod