Zenda Amucha Priya Deshacha

झेंडा आमुचा प्रिया देशाचा
फडकत वरी महान
करितो आम्ही प्रणाम याला
करितो आम्ही प्रणाम || धृ ||

लढले गांधी याच्याकरिता
टिळक, नेहरू लढली जनता
समर धूरंधर वीर खरोखर
अर्पुनि गेले प्राण

करितो आम्ही प्रणाम याला
करितो आम्ही प्रणाम || १ ||

भारतमाता आमुची माता
आम्ही गातो या जयगीता
हिमालयाच्या उंच शिरावर
फडकत राही निशाण

करितो आम्ही प्रणाम याला
करितो आम्ही प्रणाम || २ ||

या देशाची पवित्र माती
जूळती आमुच्या मधली नाती
एक नाद गर्जतो भारता
तुझा आम्हा अभिमान

करितो आम्ही प्रणाम याला
करितो आम्ही प्रणाम || ३ ||

गगनावरी आणि सागरतिरि
सळसळ करिती लाटा लहरी
जय भारत जय, जय भारत जय, गाती जयगान

करितो आम्ही प्रणाम याला
करितो आम्ही प्रणाम || ४ ||

कवी- वि म कुलकर्णी