ते देशासाठी लढले,
ते अमर हुतात्मे झाले || धृ ||
सोडिले सर्व घरदार
त्यागिला सुखी संसार
ज्योतीसम जीवन जगले
ते देशासाठी लढले || १ ||
तो तुरुंगवास ते उपवास
सोसला किती वनवास
कुणी फसवरती चढले
ते देशासाठी लढले || २ ||
झगडले झुंजले जनता
मग स्वतंत्र झाली माता
हिम शिखरी ध्वज फडफडले
ते देशासाठी लढले || ३ ||
हा राष्ट्र ध्वज साक्षिला
करू आपण वंदन याला
जय गीत गाऊया आपले
ते देशासाठी लढले || ४ ||
