Guj Othani Othana Sangaycha Song Lyrics in Marathi

गुज ओठांनी ओठांना सांगायचं
एका पावसात दोघांनी भिजायचं

तसं कधीचं आभाळ आलंय भरून
जळ ढगात साकळे केव्हापासून
वेडं उधाण कशाला रोखायचं

खुळा पाऊस डसेल सर्वांगाला
आता नको किनारा आवेगाला
धुंद धारांच्या रानात घुसायचं

गाणं मनातलं पावसात येईल फुलून
तुझ्यामाझ्यातलं अंतर जाईल पुसून
बीज नवीन गाण्याचं पेरायचं


गीत – सुधीर मोघे
संगीत – सुहासचंद्र कुलकर्णी
स्वर – उषा मंगेशकर
चित्रपट – तुझ्यावाचुन करमेना