
माय मराठी, साद मराठी
भाषांचा भावार्थ मराठी,
बात मराठी, साथ मराठी,
जगण्याला या अर्थ मराठी
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
माझा मराठीची बोलू कौतुके ।
परि अमृतातेहि पैजासी जिंके ।
ऐसी अक्षरे रसिके मेळवीन ।।
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी ।
एवढ्या जगात माय मानतो मराठी ।।
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आईचा असे माझ्या एक वेगळाच ताल स्वर
प्रेमळ ती लडिवाळ भाषा मराठी सुंदर
मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
रुजवू मराठी भाषा
खुलवू मराठी भाषा
जागवू मराठी भाषा
येणाऱ्या प्रत्येक पिढीस अभिमान वाटेल
अशी सदैव राहो माझी मराठी भाषा
मराठी भाषा दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
‘मराठी’ फक्त भाषा नाही
ती आमची ओळख आहे
मराठी भाषा दिनाचा गौरव करूया
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
शब्दांच्या या सुवर्णनगरीत
मराठीचा डंका वाजे जगात
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मराठी म्हणजे गोडवा, मराठी म्हणजे प्रेम,
मराठी म्हणजे संस्कार, मराठी म्हणजे आपुलकी,
महाराष्ट्र मराठीला माय मानणाऱ्या सर्वांना
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
रसाळ शब्द, रसाळ ओवी
हीच माझ्या मराठीची खरी पदवी
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
माझ्या मराठीची गोडी, वाटते अवीट
सर्वांना मराठी राजभाषा दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
गर्व आहे मला, मी मराठी असल्याचा
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
माय मराठीचा गौरव वाढवूया
आज मराठी दिन साजरा करूया
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा
नाजूक साजूक सौंदर्याच्या, माझ्या मराठी भाषेच्या देशा
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मराठी भाषा गौरव दिन – अभिमान आपल्या मातृभाषेचा
मराठी भाषा गौरव दिन हा प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाचा आणि आत्मीयतेचा दिवस आहे. २७ फेब्रुवारी रोजी साजरा केला जाणारा हा दिवस महान साहित्यिक वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. मराठी भाषेची समृद्ध परंपरा, साहित्यिक वारसा आणि सांस्कृतिक वैभव यांचा सन्मान करण्याचा हा खास दिवस आहे.
मराठी ही केवळ संवादाची भाषा नाही, तर ती आपल्या भावना, संस्कार आणि ओळख व्यक्त करणारी मातृभाषा आहे. संत साहित्यापासून आधुनिक कवितांपर्यंत, नाटकांपासून चित्रपटांपर्यंत आणि लोककथांपासून डिजिटल युगातील लेखनापर्यंत मराठी भाषेने प्रत्येक पिढीला जोडून ठेवले आहे.
या विशेष दिवशी आपण मराठी भाषेचा सन्मान राखण्याची आणि तिचा अधिकाधिक वापर करण्याची प्रतिज्ञा करूया. आपल्या कुटुंबात, शिक्षणात, व्यवसायात आणि सोशल मीडियावर मराठीचा अभिमानाने वापर करून आपण तिच्या जतन व संवर्धनात मोलाची भूमिका बजावू शकतो.
या पेजवर आम्ही मराठी भाषा गौरव दिनासाठी खास शुभेच्छा संदेश, कोट्स, स्टेटस आणि बॅनर दिले आहेत, जे तुम्ही तुमच्या मित्र-परिवारासोबत शेअर करून मराठी भाषेचा गौरव वाढवू शकता.
“जय महाराष्ट्र, जय मराठी!”
