Hrudayat Vaje Something Song Lyrics in Marathi

हृदयात वाजे समथिंग,
सारे जग वाटे हैपनिंग,
असते सदा मी आता ड्रीमिंग

हो.. असते उगाच स्माइलिंग,
बघता तुला मन जंपिंग,
वाटे हवे हे गोड फीलिंग..
असते उगाच स्माइलिंग,
बघता तुला मन जंपिंग,
वाटे हवे हे गोड फीलिंग..

धुंद धुंद क्षण सारे
हलके हलके फुलणारे
फिरुनी ओठांवरती येई
तुझेच गाणे

धुंद धुंद क्षण सारे
हलके हलके फुलणारे
फिरुनी ओठांवरती येई
तुझेच गाणे

खिडकीतूनी डोकावुनि
दिसतोस का पाहते तुला क्षणोक्षणी
कळात तुला मी लाजते
रोखू कशी तगमग आता ही रोजची

नजरेतूनीच माझ्या सांगते तुला मी सारे
समजेल का तुला काही
पाहते जिथे जिथे मी चेहरा तुझाच आहे
विसरते आता मलाच मी

हृदयात वाजे समथिंग,
सारे जग वाटे हैपनिंग,
असते सदा मी आता ड्रीमिंग

माझ्यात मी जपले तुला
सांगायचे जमलेच ना मला कधी
चाहूल. तुझी नुसते पुरे
भिरभिर उडे मन हे तुझ्याच भोवती

उलगडून हे पसारे
गोड़ गोड़ आठवायचे
हरुनि तुझ्यात मन राही
बंध तोडुनी हे सारे
विसरुनी तुझ्यात जावे
वाटते आता खुळ्या परी

हृदयात वाजे समथिंग,
सारे जग वाटे हैपनिंग,
असते सदा मी आता ड्रीमिंग

गीत – विश्वजित जोशी, श्रीरंग गोडबोले
संगीत – विश्वजित जोशी
स्वर – आर्या आंबेकर
चित्रपट – ती सध्या काय करते