Hirvya Hirvya Rangachi Zadi Song Lyrics in Marathi

हिरव्याहिरव्या रंगाची झाडी घनदाट
सांग्‌ गो चेड्‌वा दिस्तां कसो खंडाळ्याचो घाट

हिरव्याहिरव्या झाडीत हिरवीहिरवी पान
हिरव्याहिरव्या पानांत वारो गाता गान
पुना – बाँबे हीच गो तुझ्या सासरची वाट

खंडाळ्याच्या घाटात हवा थंडगार
थंडीमधे लाली चढे गाली गुलजार
तोर्‍यामध्ये होऊ नको उगी अशी ताठ

बोगद्यात गाडी जाता होई अंधार
अंधारात प्रीत घेता प्रीतीचो आधार
इंजिनाच्या मागे जाती डबे मागोमाग

गीत – रमेश अणावकर
संगीत – सूरज
स्वर – जयवंत कुलकर्णी, शारदा
चित्रपट – ती मी नव्हेच