Hi Poli Sajuk Tupatali Song Lyrics in Marathi

पहिल्या धारेच्या प्रेमाने साला
काळीज केलंय बाद
ही पोळी साजुक तुपातली
तिला म्हावर्‍याचा लागलाय नाद

आडुन आडुन करू नको इशारा
भिडू दे आता डोळ्याला डोळा
हिथं बि ठिणगी तिथं बि ठिणगी
जोसानं पेटू दे आग

चोरून जरी ह्यो गेटमेट झाला
खबर झायली कोलीवाड्याला
लागलाय आता तोल सुटाया
इष्काची फुटलीया लाट

गीत – गुरु ठाकूर
संगीत – चिनार – महेश
स्वर – रेशमा सोनवणे
चित्रपट – टाईमपास