फुलपांखरूं ।
छान किती दिसते । फुलपांखरूं
या वेलींवर । फुलांबरोबर
गोड किती हसतें । फुलपांखरूं
पंख चिमुकले । निळे जांभळे
हालवुनी झुलते । फुलपांखरूं
डोळे बारिक । करिती लुकलुक
गोल मणी जणुं ते । फुलपांखरूं
मी धरुं जाता । येइ न हाता
दूरच तें उडतें । फुलपांखरूं
