Vitthala Konta Zenda Gheu Hati Song Lyrics in Marathi

जगण्याच्या वारीत मिळे ना वाट
साचले मोहाचे धुके घनदाट
आपली माणसं, आपलीच नाती
तरी कळपाची मेंढरास भीती
विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती?

आजवर ज्यांची वाहिली पालखी
भलताच त्यांचा देव होता
पुरे झाली आता उगा माथेफोडी
दगडात माझा जीव होता
उजळावा दिवा म्हणुनीया किती
मुक्या बिचार्‍या जळती वाती
वैरी कोण आहे, इथे कोण साथी
विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती?

बुजगावण्यागत व्यर्थ हे जगणं
उभ्याउभ्या संपून जाई
खळं रितंरितं माझं बघुनी उमगलं
कुंपण हिथं शेत खाई
भक्ताच्या कपाळी सारखीच माती
तरी, झेंडे वेगळे वेगळ्या जाती
सत्तेचीच भक्ती, सत्तेचीच प्रीती
विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती?

गीत – अरविंद जगताप
संगीत – अवधूत गुप्‍ते
स्वर – ज्ञानेश्वर मेश्राम
चित्रपट – झेंडा