Nijaroop Dakhava Ho Song Lyrics in Marathi

निजरूप दाखवा हो, हरि दर्शनास द्या हो

अवरुद्ध साद माझा प्रतिसाद त्यास द्या हो
आला गजेंद्र मोक्षा, तैसे पुनश्च या हो
जळत्या निळ्या वीजेची प्रभु एक झेप घ्या हो

नरसिंह होवूनिया घुमवीत गर्जनासी
शतसूर्य तेज दावा अज्ञात या जनासी
भ्याला समुद्र क्रोधा ते रामचंद्र व्हा हो

पार्थास दाविले ते प्रभु विश्वरूप दावा
मुरली मनोहरा या व्हा वाजवीत पावा
एका करांगुलीने गोवर्धना धरा हो

राज:भ्रमा पटू द्या प्रत्यक्ष एकवार
श्रीकृष्ण-विष्णू-राम तोचि विठू महार
जाळी तनामनासी ती आग शांतवा हो

गीत – ग. दि. माडगूळकर
संगीत – सुधीर फडके
स्वर – सुधीर फडके
चित्रपट – झाला महार पंढरीनाथ