Lingobacha Dongur Song Lyrics in Marathi

लिंगोबाचा डोंगूर आभाळी गेला
ठाकरगडी तिथं कधी नाही गेला

हाती घेई दोर ठाकराचा पोर
सुर्व्या देव भर डोक्यावरी आला
नाग्याचा दोरा पुरा खाली-वर गेला
डोंगर चढायचा सराव चालला

गीत – ना. धों. महानोर
संगीत – पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर – चंद्रकांत काळे, रवींद्र साठे
चित्रपट – जैत रे जैत