Mi raat Takali Song Lyrics in Marathi

मी रात टाकली
मी कात टाकली
मी मुडक्या संसाराची
बाई लाज टाकली

हिर्व्या पानांत, हिर्व्या पानांत
चावळ चावळ चालती
भर ज्वानीतली नार
अंग मोडीत चालती

ह्या पंखांवरती
मी नभ पांघरती
मी मुक्त मोरनी बाऽई
चांदन्यात न्हाती

अंगात माझिया
भिनलाय ढोलिया
मी भिंगरभिवरी त्याची गोऽ
मालन झाली
मी बाजिंदी मनमानी बाई
फुलात न्हाली

गीत – ना. धों. महानोर
संगीत – पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर – चंद्रकांत काळे, रवींद्र साठे
चित्रपट – जैत रे जैत