Nabha Utaru Aala Song Lyrics in Marathi नभ उतरू आलं चिंब थर्थर वलं अंग झिम्माड झालं हिरव्या बहरात. अशा वलंस राती गळा शपथा येती साता जल्माची प्रीती सरलं दिनरात. वल्या पान्यात पारा एक गगन-धरा तसा तुझा उबारा सोडून रीतभात. नगं लाघट बोलू उभं आभाळ झेलू गाठ बांधला शालू तुझ्याच पदरात गीत – ना. धों. महानोर संगीत – पं. हृदयनाथ मंगेशकर स्वर – आशा भोसले चित्रपट – जैत रे जैत