Visaru Nako Shri Rama Mala Song Lyrics in Marathi

विसरू नको श्रीरामा, मला
मी तुझ्या पाउली जीव वाहिला
प्रिया

किती जन्म झाले तुझी प्रेमिका मी
कितीदा नव्याने तुला भेटले मी
तुझी सावली झाले, घेउनी हिंडले<
सतीचा वसा

तू सांब भोळा, उमा पार्वती मी
तू कृष्ण काळा, तुझी राधिका मी
युगायुगांचे नाते आपुले, वेगळे
जुळे श्यामला

गीत – सुधीर मोघे
संगीत – पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर – लता मंगेशकर
चित्रपट – जानकी