Ghungru Tutale Re Song Lyrics in Marathi

मी सोडुन सारी लाज
अशी बेभान नाचले आज
की घुंगरू तुटले रे

बहरली वीज देहात
उतरले प्राण पायात
वार्‍याचा धरुनी हात
अशी बेभान नाचले आज
की घुंगरू तुटले रे

मन वेडे जेथे जाय
ते जवळी होते, हाय
अर्ध्यात लचकला पाय
तरी बेभान नाचले आज
की घुंगरू तुटले रे

गीत – सुधीर मोघे
संगीत – पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर – लता मंगेशकर
चित्रपट – जानकी