एक लाजरा न् साजरा मुखडा चंद्रावाणी फुलला गं
राजा मदन हसतोय कसा की जीव माझा भुलला गं
ह्या एकान्ताचा तुला इशारा कळला गं
लाज आडवी येती मला की जीव माझा भुलला गं
नको राणी नको लाजू, लाजमधी नको भिजू
इथं नको तिथं जाऊ, आडोशाला उभं राहू
का?
बघत्यात !
रेशीम विळखा घालून सजणा नका हो कवळून धरू
लुकलुक डोळं करून भोळं बघतंय फुलपाखरू
कसा मिळावा पुन्हा साजणी मोका असला गं
डोळं रोखुन थोडं वाकून झुकू नका हो पुढं
पटघुम पटघुम करून कबूतर बघतंय माझ्याकडं
लई दिसानं सखे आज ह्यो धागा जुळला गं
बेजार झाले सोडा सजणा, शिरशिरी आली अंगा
मधाचा ठेवा लुटता लुटता बघतोय चावट भुंगा
मनात राणी तुझ्या कशाचा झोका झुलला गं?
