Mi Asa Kasa Vegla Song Lyrics in Marathi

पत्त्यामधले राजे आम्ही
केवळ मी निराळा
मी असा कसा वेगळा?

इस्पिक राजा दिमाखदार
किलवर नाजुक नक्षीदार
बदाम गोंडस अन्‌ दिलदार
नजर जगाची चुकवित फिरतो
मीच एक बावळा

चौकटीत मी घुसमटलेला
तुमच्याहुन मी जरी निराळा
तरीही तुमचा, तुमच्यामधला
माझ्यावाचुन हा पत्त्यांचा खेळ पुरा पांगळा

गीत – सुधीर मोघे
संगीत – आनंद मोडक
स्वर – दिलीप प्रभावळकर, अशोक सराफ
चित्रपट – चौकट राजा