Malmali Tarunya Majhe Song Lyrics in Marathi

मल्मली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे
मोकळ्या केसांत माझ्या तू जिवाला गुंतवावे

लागुनी थंडी गुलाबी शिर्शिरी यावी अशी, की
राजसा, माझ्यात तू अन्‌ मी तुझ्यामाजी भिनावे

तापल्या माझ्या तनूची तार झंकारून जावी
रेशमी संगीत स्पर्शाचे पुन्हा तू पेटवावे

रे ! तुला बाहूत माझ्या रूपगंधा जाग यावी
मी तुला जागे करावे ! तू मला बिल्गून जावे

गीत – सुरेश भट
संगीत – सी. रामचंद्र
स्वर – आशा भोसले
चित्रपट – घरकुल