पप्पा सांगा कुणाचे?
पप्पा माझ्या मम्मीचे
मम्मी सांगा कुणाची?
मम्मी माझ्या पप्पांची
इवल्याइवल्या घरट्यात
चिमणाचिमणी राहतात
चिमणाचिमणी अन् भवती
चिमणी पिल्लेही चिवचिवती
आभाळ पेलते पंखांवरी
पप्पांना घरटे प्रिय भारी
चोचीत चोचीने घास द्यावा
पिल्लांचा हळूच पापा घ्यावा
पंखाशी पंख हे जुळताना
चोचीत चोचही मिळताना
हासते नाचते घर सारे
हासते छ्प्पर-भिंती-दारे
