Choricha Mamla Song Lyrics in Marathi

चोरीचा मामला
मामा ही थांबला
प्रेमाने दे हाथ हाथी
तुच माझी मैना
करू नको दैना
या इष्काच्या गोड गोड राती

रात सारी आपुली
घाई नाही चांगली
तुम्ही माझा जन्माचे साथी
थोडा वेळ बसा जरा तरी सोसा
या प्रीतीच्या धुंद धुंद राती

ये ना रानी,तू येना
ना ना राजा ना ना ना

दूर अशी तु राहु नको
प्रीत अधुरी ठेऊ नको
रात नशीली तुही रसीली
मदनाचा सुटलाय वारा

आस जीवाला लाऊ नको
ध्यास असा हा घेऊ नको
प्रेम दीवाना का रे उभा हा
प्रीतीचा लागलाय नारा

ये ना रानी,तू ये ना
ना ना राजा ना ना ना

वेड तुझे हे आहे मला
सांगु मी कशी वेड्या तुला
रंगबसंती मिलन राती
लाजून चुर मी झाले
प्रीत फुला तु लाजु नको
ओढ़ अशी ही धरु नको
धुंद जवानी आज पुरानी
मदहोश जग हे झाले

मी ना राजा तू ये ना
ना ना ना राणी तु येणा

चोरीचा मामला
मामा ही थांबला
प्रेमाने दे हाथ हाथी
तुच माझी मैना
करू नको दैना
या इष्काच्या गोड गोड राती

रात सारी आपुली
घाई नाही चांगली
तुम्ही माझा जन्माचे साथी
थोडा वेळ बसा जरा तरी सोसा
या प्रीतीच्या धुंद धुंद राती

ये ना रानी,तू येना
ना ना राजा ना ना ना

गीत – शांताराम नांदगांवकर
संगीत – अरुण पौडवाल
स्वर – अनुराधा पौडवाल, सचिन
चित्रपट – गंमत जंमत